जे बिलगले मला ते
तुज्हेच सूर होते
धुके वितळण्याआधी मी
लोटिले दूर होते।
झाडास पालवीचे
उगवणे कळाले नाही
जळाले रानच जेव्हा
डोळ्यांत धूर होते।
जखमेवर फुंकर कशाला
भडकेल अजूनच ज्वाला
निखारे उचलताना
करपले उर होते।
स्वप्नांची रचिली माळ
राउळे जशी ओळीने
प्रार्थनेत संध्याकाळी
रात्रीचे काहूर होते।
No comments:
Post a Comment