Friday, August 21, 2009

संदीप खरे -सलील कुलकर्णी अणि विभावरी आपटे सुंदर गाणे



संदीप खरे -सलील कुलकर्णी अणि विभावरी आपटे सुंदर गाणे


प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी
प्रेमात म्हणे कुणी अडखलते बघ धडपडते कोणी!

प्रेमात म्हणे मौनत बुडे, ना सुटे घडी ओठांची
प्रेमात म्हणे शब्दास भूल, जगण्यास जुल कवितेची
प्रेमात म्हणे जो गड़बड़तो तो बडबडतो गाणी!!
प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी

प्रेमात म्हणे हातात हात, होतात घात जन्माचे
प्रेमात म्हणे मिटतात श्वास, फिटतात पाश मरणाचे
प्रेमात म्हणे आरम्भ गोड अन अन्तापास विराणी
प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी

मज ठाव नसे हे प्रेम कसे पण ऐक तुज्याविन आता
क्षण एक दूर जाताच पुर डोळ्यात दाटती माज्या!
जो बुडालेला तो तरलेला, तरला तो बुडला, राणी!!
प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी

प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी
प्रेमात म्हणे कुणी अडखलते बघ धडपडते कोणी!
-संदीप खरे

का मी आज पुन्हा उगीच बसलो मांडून ही खेळणी?

कोणी आज इथे अचानक अशी ही टोचली टाचणी?
तोंडातून न एक शब्द फुटला, ओलावली पापणी
घे तारांगण सूर्य चंद्र सगळे तू जाग येताक्षणी
राहो तारण माझियाजवळ ही स्वप्नातली चांदणी
बापाने खत होउनी जगवली ती कालची पेरणी
आले पुत्र तशी कशी चटदिशी झाली सुरू कापणी?
ज्यायोगेच किती सुखात जगल्या वर्षानुवर्षे पिढ्या
झाली आजच का अशी मग जुनी ती कालची मांडणी?
आली थेट इथे मनात बसली, बोलून गेली तरी
नाही बेत तिचे मला समजले, ती केवढी धोरणी!
गेलो बोलविले म्हणूनच तिथे, मी सत्य ते बोललो
(त्याच्यानंतर मात्र फार तसली आली न बोलावणी)
आता ह्या इवल्या जगात मजला कोंडून मी घेतले
आल्या तोच कश्या इथे दशदिशा लांबून सार्‍याजणी?
माझे प्रश्न मलाच चार पडले, मी उत्तरेही दिली
होती चूक न ती, बरोबर न ती, ही कोणती चाचणी?
त्यांना ते चरण्यास रान तिकडे, ह्यांना मिळाले इथे
सोयीची म्हणुनीच रोज घडते जेथेतिथे वाटणी
त्यांच्या बाह्यगुणावरी न भुललो, मी आत डोकावलो
त्यांनी सत्वर घेतली मखमली आतूनही ओढणी
आईबाप जरी जगात नसले, जा तू सुखाने घरी
ते वृंदावन आणि ती तुळसही आहेच की अंगणी!
आयुष्यात गमावले क्षण किती, कामास आले किती?
ती म्हटली "तुझियामुळेच जगले", आटोपली मोजणी
झाली भातुकली जुनी, हरवले ते मित्र त्या मैत्रिणी
का मी आज पुन्हा उगीच बसलो मांडून ही खेळणी?

- प्रणव

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत
खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत
पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत
नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत
एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत
तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत
दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत
मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत
हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत
नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत
इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत
पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत
-प्रणव

Thursday, July 23, 2009

सुंदर गोड अप्सरा



एकदा "BEST" मध्ये प्रवास करतांना
एक सुंदर गोड अप्सरा मला दिसली

CONDUCTOR च्या सीट वर ती कोप-यात एकटीच होती बसली
मोकळी जागा पाहुन मी
माझी "तशरिफ" तेथेच ठेवली
मला पाहताक्षणीच तिने
आपली पर्सच उचलुन ठेवली

उघडया खिडकितुन वारा
तसा फ़ारच जोरात येत होता
तिच्या ओढनीला माझ्या चेह-यावर
हळुवार उडवीत होता

ती मात्र ओढनी सावरत सावरत
स्वत:शीच गुनगुनत होती
नकळत दोघातील अंतर कमी करन्यासाठी
मला हाथभार लावत होती

बसमधला प्रत्येक प्रवासी
आमच्याकडेच बघत होता
मी तेथुन केव्हा उठेल
बहुतेक याचीच वाट पहात होता

तेवढ्यात बसच्या धक्क्याने
आमच्या दोघांतील अंतर कमी केले
एका मिनीटासाठी का होईना
मला स्वप्नाच्या दुणियेत नेले

मग दुस-या धक्क्यालाच मी
स्वप्नातुन बाहेर आलो
एक मिनिटातच तिच्यासमवेत
बरीच काही लाईफ़ जगुन गेलो

येवढ्यात CONDUCTOR माझ्याजवळ आला
लेडिज सीट सांगुन मला उठवुन गेला
तेव्हा त्या मेल्याचा राग भलताच आला
स्वप्नाचा माझ्या त्याने चुराडाच केला

मग पुढच्या STOP वर उतरन्यासाठी
ती तीची PURSE सावरायला लागली
गर्दित मला खेटत खेटत
स्वत:ची वाट काढु लागली

खाली उतरताच माझी नजर
एकटक तिला शोधु लागली
ती मात्र BOYFRIEND च्या गाडीवर बसुन
केव्हाचीच हवेशी बोलु लागली
आमच्या महालात रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते
आम्हाला आवडलेली रानी
जेव्हा तेव्हा "ENGAGE" च असते

Wednesday, June 10, 2009






मला माहित आहे की तूला पण मी आवडतो !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
पण तू हे कधीच मला बोलली नाहीस .
असो पण माझ तुझ्यावर प्रेम आहे
आणि ते मी तुला कायम सांगत आलो आहे....
बघ मग काय करायचं ते... .

---------तुझाच प्रणव कुलकर्णी......

Friday, May 29, 2009

मा। राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणारा लेख.)-
राजू परुळेकरमाझी पहिली ओळख…
राजला खाजगीत अगदी जवळचे मित्र आणि नातेवाईक राजा म्हणतात. हे त्याला एकदम फिट्‌ट बसणारं नाव आहे. जर त्याचं स्वभावानुसार नाव ठरवायचं झालं, तर ते राजाच असायला हवं. याची अगदी अनेक कारणं आहेत. पण त्यातलं अगदी महत्त्वाचं कारण म्हणजे तो कधीही कुणाचंही वाईट चिंतीत नाही. अगदी शत्रूचंही. मला त्याच्या या गुणाचं फार आश्चर्य वाटतं. राजा माझा परममित्र असण्याचं हे एक सर्वांत महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं. कारण राजला भेटेस्तोवर मला शत्रूबाबत विषारी भावना माझ्या मनात येत नाही ही माझी दुर्बलता वाटत असे. पण राजला भेटल्यावर माझ्या मनातली भावना न्यूनगंडासारखी होती, ती माझ्या शक्तिस्थानासारखी वाटू लागली.राजमध्ये प्रचंड करिष्मा आहे, हे मी नव्याने सांगण्याची गरज नाही. त्याबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. पण हा राजचा करिष्मा किंवा राजची ती जादू योगायोगाने किंवा अपघाताने आलेली गोष्ट नाही. राज वयाच्या तेवीसाव्या वर्षापासूनच राजकारणात आहे. तेव्हापासून त्याने कण-कण करून माणसं जोडलेली आहेत. त्यांची काळजी केलेली आहे. आजही राज जेव्हा बाहेर कुठेही किंवा दौर्‍यावर जातो, तेव्हा बरोबरच्या माणसांची आधी काळजी घेतो. त्यांची सोय नीट होते आहे की नाही यावर त्याचं अगदी बारीक लक्ष असतं. राज आक्रमक राजकारण करतो किंवा त्याची वक्तृत्वकला तडफदार आहे म्हणून केवळ जादू पसरत नाही, तर सोबतच्या माणसांची तो पराकोटीची काळजी घेतो. जनतेला असा नेता आवडला तर नवल काय? व्यवसायामुळे म्हणा किंवा कामाच्या प्रकारामुळे देशातले अनेक सामाजिक आणि राजकीय नेते मी पाहिले. बहुतेकांना आपल्या बायका-मुलांपलीकडे कुणी माणसं आपल्यासोबत असतात आणि त्यांची काळजी आपणच वाहायला हवी याची जाणीवच नसते. राज या सार्‍यांपेक्षा अगदी वेगळा आहे.
नारायण राणे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा मालवणमध्ये पोटनिवडणूक लागली. त्या निवडणुकीसाठी संपूर्ण शिवसेना कोकणात उतरली. त्या वेळी राजचा मुक्काम कणकवलीच्या हॉटेल शर्मिलामध्ये होता. तिथे परिस्थिती अशी होती की माणसं भरपूर होती आणि रुम्स कमी होत्या. राणेंनी मतदारसंघातील सर्व हॉटेल्स आधीच बुक करून ठेवल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भलतीच पंचाईत झालेली होती. अशा वेळी राज हॉटेलमध्ये आपल्या खोलीत जास्तीत जास्त जणांना सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील होता. त्या वेळेला शिवसेनेचे अनेक बडे नेते आपली हॉटेलमधली सोय कशी अधिक ‘फुलप्रूफ’ होईल ते पाहण्यात मग्न होते. आता शिवसेनेचे नेते असलेले आणि महाराष्ट्राचे विद्यमान विरोधी पक्षनेते रामदास कदम हे शर्मिला हॉटेलमधल्या आमच्या शेजारच्याच रूममध्ये राहत होते. इतर अनेक नवे कार्यकर्ते येऊन आपल्या राहण्याच्या सोयीवर आक्रमण करू पाहताहेत हे पाहिल्यावर रामदास कदम हे ‘मानापमाना’ चा खेळ सुरू करून बॅगा घेऊन निघाले होते. ‘‘तुमच्या निवडणुका तुम्ही लढवा. मी चाललो खेडला’’, असे बाणेदार उद्‌गार काढून ते निघाले. तेव्हा ज्येष्ठ - कनिष्ठतेचा वाद बाजूला सारून राज स्वत: समजूत काढून कदमांना परत घेऊन आला. शिवसेनेच्या इतिहासातल्या सारगर्भ दिवसात मी निवडणूक क्षेत्रात राजसोबत होतो. त्या क्षणी सभोवतालच्या परिस्थितीचं अचूक राजकीय आकलन त्याच्याएवढं दुसर्‍या कोणत्याच शिवसेना नेत्याला नव्हतं. त्या काळात राजने शिवसेना सोडण्याचं ठरवलेलं होतं अशा वावड्या नंतर उडवण्यात आल्या. खरं तर त्या काळात राजने कमालीचा संयम पाळला होता. जो पाळणं हे कमालीचं कठीण होतं. एक तर संपूर्ण निवडणूक मोहिमेची आखणी ही राजला वगळून करण्यात आलेली होती. दुसरं म्हणजे, त्याला राणेंशी लढवून एकंदरीत महाराष्ट्र आपल्या ताब्यात ठेवावा अशी पुढच्या काळासाठीची संकल्पना शिवसेनेत आकारत होती. राजला हे कळत होतं. तो प्रचंड अस्वस्थ होता. गंमत म्हणजे त्याची ही अस्वस्थता राजकीय असुरक्षिततेतून आलेली नव्हती, तर त्याला त्रास होत होता तो भावनिक. संपूर्ण शिवसेना आणि शिवसेना नेते हे कमालीच्या राजकीय असुरक्षिततेने भेदरलेले होते.
राजला त्याबाबतीत मात्र कधीच काही असुरक्षितता नव्हती. त्याचा स्वत:च्या नेतृत्व क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. पण त्या काळात त्याची भावनिक आंदोलनं ही त्याच्या जवळच्यांना प्रचंड अस्वस्थ करत होती. तेव्हा आणि त्यानंतरच्या अनेक रात्री राजने जागून काढलेल्या आहेत. त्याच्या मनात विचार फक्तं बाळासाहेबांचाच असे. He loves me, He loves me not… असं काहीसं त्याच्या मनाशी चाललेलं असे. बाळासाहेबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. बाळासाहेबांचं माझ्यावर प्रेम नाहीए… अशा मानसिक आंदोलनात त्याने इतक्या शक्यतांचा विचार केला होता की मला नाही वाटत की, त्याच्या राजकीय आणि व्यक्तिगत शत्रूंनी बाळासाहेबांसंबंधी त्याच्या एक लक्षांश विचार केला असेल. अगदी निष्पक्षपणे, नीरक्षीरविवेक ठेवून आणि ईश्वराला स्मरून जर मी लिहायचं ठरवलं, तर मी बाळासाहेबांसोबतच्या आणि शिवसेनेच्या नेतृत्वातल्या पहिल्या वर्तुळातल्या प्रत्येक माणसाला त्या काळात अगदी जवळून पाह्यलंय. मी नि:संदिग्धपणे असं म्हणेन की, बाळासाहेबांवर राजइतकं निस्सीम आणि इतकं परिपक्व प्रेम इतर कुणीही केलेलं नाही. मुख्य म्हणजे त्याच्याइतके बाळासाहेब कुणाला नीट कळलेच नाहीत. त्यांचं सामर्थ्य आणि त्यांच्या चुकांसहित राजने त्यांना समजावून घेतलं आणि निरपेक्षपणे त्यांच्यावर प्रेम केलंय.

समज आणि गैरसमज…
राजची आणि माझी ओळख नव्हती त्या काळात मला राज हा अतिशय उद्धट आणि अतिआक्रमक वाटायचा. त्याची माझी मूळ ओळख उदय तानपाठक नावाच्या आमच्या एका मित्राने करून दिली. तो एका सकाळी मला राजकडे घेऊन गेला. ती भेट सकाळी फार लवकर ठरल्याने माझ्या डोळ्यांवर फार झोप होती. मी एकाच गोष्टीमुळे राजच्या भेटीबाबात प्रतिकूल होतो. त्या भेटीत राजने हिंदुत्वाबाबत आपली मतं मांडल्याचं मला आता स्मरतं. राज तेव्हा मला म्हणाला होता, ‘‘हिंदुत्व वगैरे सगळं ठीक आहे. पण खरं तर महाराष्ट्रात मराठी माणूस, गुजराती आणि मारवाडी-जैन माणूस मिळून महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करायला हवा. शिवाय मराठी माणूस म्हटलं की, खेड-मालेगावचा मुसलमान नाही तर वसईचा ख्रिश्चन तुम्ही कसा वगळणार?’’ मी ते ऐकून चाट पडलो. राजची प्रतिमा तेव्हा प्रतिबाळासाहेब अशी होती. मला वाटलं होतं तो त्या पद्धतीने बोलेल पण ऐकलं ते हे. नंतर अलीकडे एकदा बोलतानासुद्धा तो म्हणाला, ‘‘आपली ज्या प्रकारची तपश्चर्या असते, त्याच प्रकारचं आपण बोलावं. म्हणजे त्यावर आपला विश्वास बसतो आणि लोकांचाही. आमच्या आजोबांची ज्या प्रकारची तपश्चर्या होती, ते त्या प्रकारचं बोलत. बाळासाहेबांची ज्या प्रकारची तपश्चर्या होती, ते त्या प्रकारचं बोलले. मी तेच बोलतो ज्यावर माझा विश्वास आहे. उगाच बाळासाहेबांच्या भाषणाच्या कॅसेट्‌स ऐकून हिंदुत्वावर बोलण्याने माणसाचा विदूषक होईल. तपश्चर्येशिवायचे इशारे म्हणजे साबणाचे फुगे! मला ते उडवायचे नाहीत.’’ राज विचार करतो तो असा.पहिल्या भल्या सकाळच्या भेटीनंतर त्याची अन्‌ माझी मैत्री झाली असं नाही. गंमत म्हणजे राजच्या अगोदरपासून माझी आणि उद्धवची ओळख होती. राजच्या संदर्भात जो उद्धव येतो तेवढंच या ठिकाणी लिहिणं अपरिहार्य. उद्धवच्या बाजूने राज आणि राजच्या बाजूने उद्धव जेवढा मला कळला, त्यातून मला जे आकलन झाले ते तसं क्लेशदायक होतं. इथे उद्धव किंवा राजच्या राजकारणाचं मूल्यमापन मी करत नाहीए. दोघांनाही त्यांचं राजकारण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यासाठी जे जे करावं लागतं, ते करण्याचा व ते करताना डावं-उजवं न पाहण्याची दोघांनाही मुभा आहे. परंतु राजच्या बाबतीत जे झालं ते नि:संदिग्धपणे अन्यायकारक होतं. कारण शिवसेनेमध्ये राजची राजकारणाची समज त्यांच्या पिढीतली सर्वात अव्वल समज होती. त्याच्यामध्ये सर्व काही मंगल करण्याची स्वप्नं होती. त्याच्याकडे त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारे तरुण होते. त्याची मागणी ही कामाच्या, जबाबदार्‍यांच्या वाटपाची होती. याचं उत्तर ‘तुझ्यासाठी सर्व महाराष्ट्र खुला आहे’ हे असू शकत नव्हतं. (अर्थात या उत्तराच्या शेवटी त्याने योग्य तो बोध घेतलाच!) वास्तवात जे होत होतं, त्याची सामान्य जनतेला योग्य ती कल्पना नाहीए. मी स्वत: डोळ्यांनी पाहिलेलं एक उदाहरण लिहितो. राज शिवसेनेत प्रचंड लोकप्रिय होता. तो जिथे जात असे, तिथे त्याला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी चोरून-चोरून भेटायला येत असत. मी ‘चोरून चोरून’ असं लिहिलं आहे त्याचं उदाहरण एकदा मला पाहायलाच मिळालं. त्या अगोदर या सार्‍यांना राजला भेटायचं असेल, तर चोरून भेटावं लागतं असं मी ऐकलेलं होतं. पण माझा त्या कथांवर विश्वास नव्हता. पण एकदा पुण्यात राज असताना असेच शिवसेनेचे काही पदाधिकारी त्याला (चोरून) भेटायला येत होते. इतक्यात पुण्याचे संपर्कप्रमुख असलेले रवींद्र मिर्लेकर राजला भेटायला ‘अधिकृत’ पणे येत आहेत अशी बातमी आली. तेव्हा आपापल्या भेटी गुंडाळून तत्कालीन शिवसेना पदाधिकारी मिटिंग आवरून अक्षरश: राजच्या घरातून पळून गेले! त्यांना म्हणे, त्यांच्या नावाची यादी ‘मातोश्री’वर सादर होईल अशी भीती होती! त्या वेळीही त्यांच्यावर राजचं म्हणणं गमतीशीर होतं, तो म्हणायचा, ‘‘पदांवर बेतलं तर उड्या टाकून पळून जाणार्‍यांच्या जीवावर महाराष्ट्राचं राजकारण कसं करणार? उद्या महाराष्ट्रावर संकट आलं, तरीही हे उड्या टाकूनच पळणार. वेळ कोणतीही असली, तरी पाय रोवून उभे राहतील असे पाच लोकसुद्धा महाराष्ट्राचं भलं करतील!’’ गंमत म्हणजे, त्या उड्या टाकण्याच्या प्रसंगात शिवसेनेच्या एकाच पदाधिकार्‍याने उडी टाकली नव्हती. ते म्हणजे शिवसेनेचे तत्कालीन आमदार दीपक पायगुडे! मला वाटतं, आपलं आपलं राजकारण करण्याचा आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी वाट्टेल ते करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आपण मान्य केला, तरीही क्षुद्र आणि स्वार्थी माणसांच्या सल्ल्यावरून राजची जी मानखंडना होत होती ती खचितच समर्थनीय नव्हती. या काळात सुभाष देसाई हे शिवसेनेच्या पहिल्या वर्तुळाचे नाना फडणवीस होते. या काळात राजची जी मानसिक घालमेल होत होती, ती पराकोटीची त्रासदायक होती. आपण काही निर्णायक पाऊल उचललं तर बाळासाहेबांना जो त्रास होईल तो एकीकडे आणि एका कर्तृत्ववान पुरुषाला संघटनेतल्या पाच हजारो मनसबदारांकडून जी मानखंडना करून घ्यावी लागत होती ती दुसरीकडे. या कात्रीत राज सापडला होता. पिंजर्‍यात सापडलेल्या वाघासारखा राज तडफडत असे. मी स्वत: त्याच्यासोबत अशा अनेक संध्याकाळी बोलत काढलेल्या आहेत. ‘पिंजर्‍यामध्ये वाघ सापडे, बायका-पोरे मारिती खडे’ म्हणजे काय, याचे प्रात्यक्षिकच तेव्हा शिवसेनेने उभे केले होते. फरक एवढाच होता की, इथे पिंजरा बाळासाहेबांच्या प्रेमाचा होता. तो नंतर राजने तोडला. पण ते खूप नंतर. अगदी भिंतीला पाठ टेकल्यावर. त्या अगोदर खूप रामायण घडलं. त्यातल्या प्रत्येक नाही, तरी बर्‍याच घटनांचा मी साक्षीदार आहे. एवढं मात्र खरं की, राज त्या काळात खूप प्रतिष्ठेने आणि संयमाने वागला

राज : कल्पनेतला आणि खरा…
हे सगळं घडायच्या आधी मी राजची एक मुलाखत घेतली होती. ती घेत असताना मी राजसोबत कम्फर्टेबल नव्हतो. बहुदा तोही नसावा. मला सतत असं वाटत होतं की, मी जाणीवपूर्वक समोरच्याला अडचणीत आणण्याकडे कल असणारा मुलाखतकार आहे असा त्याचा कुणीतरी समज करून दिला होता. तो सतत प्रश्न कापून उत्तर देण्यावर भर देत बोलत होता. त्याअगोदर किणी प्रकरणामध्ये त्याच्यावर ज्या प्रकारे आरोप करण्यात आले होते, संपूर्ण समाजवादी कंपू कुणाला तरी नष्ट करण्यात नेहमीच आनंद व उत्सव मानतो, तशाच प्रकारे सर्व तयारीनिशी त्या प्रकरणात उतरला होता. त्या समाजवादी आरोपांवर व्यक्तिश: माझा अजिबात विश्वास नव्हता. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणींवर जादू करणार्‍या या तापट आणि आक्रमक नेत्यावर त्या प्रकरणाचा एवढा धुरळा का उडाला याचा शोध घ्यावा असे मला सातत्याने वाटत होते. खूप मागोवा घेतल्यावर हाती जे लागलं ते हेच होतं की, अशा प्रकारच्या षड्‌यंत्रात गोवण्यासाठी व राजची प्रतिमा मलीन करण्याचा कट खूप अगोदरपासून चालू होता. फक्त जोडण्याकरता योग्य ते प्रकरण हाताशी लागत नव्हतं. वास्तविक या प्रकरणाचं जे काही होतं, ते आणि राजच्या वर्तुळाचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. तरीही त्या काळात समाजवादी पत्रकारांनी राजला त्याच्या प्रत्यक्ष शत्रूंपेक्षाही मानखंडित केलं. प्रत्यक्ष पुराव्यांपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वांनी हे संपूर्ण प्रकरण आधारहीन असल्याचे निष्कर्ष प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रकारे देऊनही, त्या काळात राजला, त्याच्या कुटुंबीयांना अपरिमित त्रास सोसावा लागला. मला असं वाटतं की, या षड्‌यंत्रात अशा रीतीने फसावं असे काही दोष राजमध्ये आहेत. हे अर्थात मला नंतर कळलं. तो माणसांवर चटकन विश्वास टाकतो. नको इतका विश्वास टाकतो. कुणी आपलं वाईट करेल यावर त्याचा विश्वासच नसतो. त्याचं इतक्या जणांनी, इतक्या वेळेला, इतकं वाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की कल्पना म्हणून आपण त्या जागी असण्याची मला प्रचंड भीतीच वाटते. तरी हे पचवून राज माणूसवेडा राहिला आहे. एखाद्या किंवा कुणाही माणसावर दुसर्‍या भेटीतच संपूर्ण विश्वास टाकणारा राज हा भारतातला एकमेव राजकीय नेता असावा! याचा अर्थ तो चतुर नाही असं नव्हे, तो प्रसंगी अतिचतुरतेने वागतो. मुख्य म्हणजे तो कोणतीच गोष्ट कधीच विसरत नाही. तुमची एखादी बारीकशी हालचाल, उद्‌गार किंवा युक्तिवाद त्याच्या वर्षानुवर्षे लक्षात राहतात. जेव्हा वेळ येते, तेव्हा तो ते आपल्या पोतडीतून बाहेर काढून त्याचा वापर करतो. अगदी जवळून पाह्यलेलं असल्याने मी हे सांगू शकतो की, याबाबतीत त्याची तुलना शरद पवारांशीच करावी लागेल. फक्त्त फरक एकच. पवारसाहेबांनी छोट्या माणसांची नावं आणि मोठ्या माणसांची कामं लक्षात ठेवली असं इतिहास सांगतो. राज नेमकं उलटं करतो. अनेक छोट्या माणसांच्या कसल्या कसल्या कामांसाठी राजने कुणाकुणाला फोन केल्याचं मी पाह्यलंय. शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी राजकडे माणसं उभी असतात आणि राज स्वत: फोन करून नंतर काम झाल्याची खात्री करून घेतोय हे दृश्य मी दरवर्षी पाहत आलोय. गंमत म्हणजे इतर सर्व राजकीय पक्षाचे नेते आणि नेत्यांची मुलं त्यांच्याच पक्षाची सत्ता राज्यात आणि देशात असताना यंत्रणेकडून काम करून घेण्यासाठी राजकडे येतात आणि ती कामं करून घेतात. इथे नावं लिहिणं किंवा त्यांची कामं संयुक्तिक नसल्याने मी ती लिहीत नाही. नाहीतर ती यादी आणि कामं वाचून बर्‍याच जणांना चक्कर आली असती.
राजू परुळेकर

Wednesday, May 20, 2009

प्रेम

प्रेम ही एक स्वाभाविक भावना आहे, तरीही प्रेमात पडण्याची वा प्रेमात असण्याची परिस्थिती निर्माण करण्याची योजना तुम्ही ठरवून अमलात नाही आणू शकत. ही बाबच अशी आहे की, तुमचं तिच्यावर अजिबात नियंत्रण नसतं. तुम्ही एकतर प्रेमात पडता किंवा पडत नाही. ही घटना तुमच्याकडून घडून जाते. रामकृष्णांनी वेगळ्या प्रकारे समजावताना म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी प्रचंड लाट येते, त्यावेळी छोटे-मोठे ओढे नि नाले काही समजायच्या आत विनासायास काठोकाठ भरून जातात.

अर्थात एखादी व्यक्त प्रेमात आहे की नाही हे ओळखण्यासाठी काही निकष आहेत. याची पहिली चाचणी म्हणजे तुम्ही प्रेम करत असलेली गोष्ट केवळ तुमच्याच ताब्यात असावी असा तुमचा आग्रह नसतो. सगळ्या जगाला तुमच्या प्रेमाची महती कळावी अशीच तुमची इच्छा असते. अगदी घराच्या छपरावरून ओरडून जगाला तुमच्या प्रेमाची ओळख करून देण्याची तुमची तयारी असते. तुम्ही प्रेमात असलेल्या व्यक्तीच्या सुखासाठी काहीही करायची तुमची तयारी असते. महात्मा गांधींनी म्हटलंय प्रेम आणि संपूर्ण मालकीची भावना कधीच एकत्र नांदू शकत नाहीत. तात्त्विकदृष्ट्या जिथे कुठे आदर्श प्रेम आहे, तिथे ताबा ठेवण्याच्या वृत्तीचा लवलेशही असता कामा नये.

प्रेमाची दुसरी चाचणी म्हणजे इथे घासाघिशीची शक्यता नसते. कशाच्या तरी बदल्यात बक्षीस वा कमतरतेच्या बदल्यात दंड वगैरे गोष्टी प्रेम ओळखत नाही. प्रेम स्वत:च एक गुणवत्ता असते, ते स्वत:च एक बहुमान असते. स्वत:च्या अस्तित्त्वाखेरीज प्रेमाला कारण, फायदे या बाबी नसतात, प्रेमाचा आविष्कार हीच प्रेमाची फलनिष्पत्ती असते.

एखादी इच्छा वा लाभाची अपेक्षा बाळगून, काहीतरी कमावण्यासाठी तुम्ही कुणाच्या प्रेमात पडत नाही, तर प्रेमाच्या अनुभूतीसाठी तुम्ही प्रेमात पडता. कुठलातरी शाश्वत वा अशाश्वत शेवट गाठणं म्हणजे प्रेम नाही, तर प्रेम स्वत:च एक शेवट आहे, आपल्याबाबतीत काही चांगल्या घटना घडल्या की, त्यांना दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रेम नाही, तर प्रेम ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ओशो म्हणतात, तुम्ही प्रेम दिलंत की, ते लाखपटीने तुम्हाला परत मिळतं. इथं देणं ही क्रिया इतकी स्वाभाविक व परिणामदर्शक आहे की, जर तुम्ही दिलं नाहीत, तर ते तुम्ही गमावता, तुमच्या डोक्यावर ते एक ओझं बनून राहतं. प्रेमाचं रुपांतर द्वेषात होतं, ते मग भीती, दु:स्वास, ताबा ठेवण्याची वृत्ती अशा मार्गानं प्रकटू लागतं.

प्रेमाची तिसरी चाचणी म्हणजे 'मी'पणाला, 'अहं'ला रामराम! प्रेम करणं म्हणजे दुसऱ्याला विनाअट शरण जाणं, स्वत:मधला आणि दुसऱ्यामधला भेद संपुष्टात आणणं, आपल्या 'अहं'ला तिलांजली देणं. खऱ्या प्रेमामध्ये प्रियकर आणि प्रेयसी एक होऊन जातात. स्वत:ची वेगळी अशी ओळख, अलगत्वाची भावना नाहीशी होते. त्यामुळे मग दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर बंधनं टाकण्याचा प्रश्नच येत नाही, उलट अशा एकीकरणामुळे प्रेमीजनांना प्रचंड स्वातंत्र्य मिळतं, अहंकाराच्या बंधनापासून ते मुक्त होतात.

खऱ्या प्रेमाची चौथी चाचणी म्हणजे ते भयमुक्त असतं. अतृप्त इच्छांमुळे भीतीची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. तुमच्या प्रेमामध्ये कुठल्यातरी दंडाची, शिक्षेची शक्यता असेल, किंवा अतृप्त इच्छांच्या पुर्ततेची आशा असेल, तर याला प्रेम म्हणता येणार नाही. प्रेम आणि भीती एकत्र नांदू शकत नाहीत, कारण जिथे प्रेम असते, तिथे इच्छा वा मागण्यांना थारा नसतो.

प्रेमाची पाचवी चाचणी म्हणजे तुम्हाला जे सवोर्त्कृष्ट वाटतं, त्याच्यावर तुम्ही प्रेम करता. त्यामुळे प्रियकर वा प्रेयसी, एखादी गोष्ट वा आदर्श हे एकमेव असतात, त्यांच्याप्रमाणे दुसरं कोणी नसतं. प्रियकराच्या नजरेत ते सवोर्च्च स्थान असतं, इतरांना काय वाटतं याचा त्याच्याशी काही संबंध नसतो. दुसऱ्यांसाठी दुसरा एखादा आदर्श सवोर्च्च स्थानावर असेल, परंतु प्रियकरासाठी त्याची आवडती व्यक्ती वा आदर्शच सवोर्त्तम असतो.

प्रेमाची सहावी चाचणी म्हणजे प्रियकर आपल्या प्रेमाच्या बाबतीतल्या विद्वत्ताप्रचुर पण आधार नसलेल्या चर्चा-मसलतींना फारसं महत्त्व देत नाही. अशा तात्त्विक उहापोहाकडे दुर्लक्ष करून तो आपल्या थेट अनुभवाला प्राधान्य देतो. तो उगाच कारणं देत बसत नाही, वा आपली बाजू वादविवादाच्या माध्यमातून इतरांना पटवायलाही बघत नाही. तो केवळ स्वत:चा थेट अनुभव आणि जाणीव यांच्यावर विसंबतो.

Posted by Pranav…..