Friday, August 21, 2009

संदीप खरे -सलील कुलकर्णी अणि विभावरी आपटे सुंदर गाणे

प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी
प्रेमात म्हणे कुणी अडखलते बघ धडपडते कोणी!

प्रेमात म्हणे मौनत बुडे, ना सुटे घडी ओठांची
प्रेमात म्हणे शब्दास भूल, जगण्यास जुल कवितेची
प्रेमात म्हणे जो गड़बड़तो तो बडबडतो गाणी!!
प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी

प्रेमात म्हणे हातात हात, होतात घात जन्माचे
प्रेमात म्हणे मिटतात श्वास, फिटतात पाश मरणाचे
प्रेमात म्हणे आरम्भ गोड अन अन्तापास विराणी
प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी

मज ठाव नसे हे प्रेम कसे पण ऐक तुज्याविन आता
क्षण एक दूर जाताच पुर डोळ्यात दाटती माज्या!
जो बुडालेला तो तरलेला, तरला तो बुडला, राणी!!
प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी

प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी
प्रेमात म्हणे कुणी अडखलते बघ धडपडते कोणी!
-संदीप खरे

No comments: