Tuesday, April 27, 2010

पुन्हा मी मिळणार नाही

पुन्हा मी मिळणार नाही

मागून बघ जीव ही
नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही
तुझा झालो तेव्हाच मी
माझ्यासाठी सपलो होतो
प्र त्येक क्षण तुझ्यासाठी
तुझ्या बरोबरच जगलो आहे
श्वसांच्या प्रत्येक स्पंदणात
फक्त तुलाच तर जपले आहे
श्वास ही नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही
तुझे मज़े काही असते
कधी कळलेच नाही
तुझ्या शिवाय जगायचे
स्वप्न ही पडले नाही
मागून घे स्वप्ने ही नाही
मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही
स्वर्ग सजवायचा तुज्यासाठी
म्हणून सार करत होतो
जमिनीवर उभे राहून
आकाशालही पकडत होतो
उगडून भाग मूठ ही
नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही
ईतकेच सांगतो तुला ही
माझ्या शिवाय जमणार नाही
आणि तुझे ते तरफडणे
मे सहन करणार नाही
मागून हे अंत ही
नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही

-प्राण कवी

break-up

काय म्हणता..?
अहो खरंच,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

तुझ्याशिवाय जगणं अन्
मरणंहि नाही,
असलं काहिसं
दोघंहि म्हणायची,,
नको-नको असतांनाही
एकमेकांना तरी बरंच झेललंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

प्रेमाचे भास असतील कदाचित सारे
गोंडस अशा या नात्यातलं
प्रेम पूर्णपणे उतू गेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

खरं प्रेम lifetime असतं,
आज आहे अन् उद्या नाही
असं त्यात कधीच नसतं,,
एकमेकांच्या विश्वासाचं
फूलपाखरू कधीच उडून गेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

तो म्हणतो ती अशीच आहे,
ती म्हणते तोही तसाच आहे,,
सारं काहि असं-तसंच असेल
तर सोबतीचा तुमचा आग्रह का आहे..?
दोघांचं मन एकमेकांसाठी
यापुर्वीच आत्महत्या करून मेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

काय वाटलं असेल कुणास ठावुक
पण मनाच्या मृत्यूनंतरच्या
अंत्यसंस्काराचं काम मात्र
दोघांनीही यथासांग केलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

ती-तिचा नवरा
तो अन् त्याची बायको
चौघांमध्येही तो मात्र तिची
उगाच अशी छेड़ काढणार,
पण गैरसमज नको हं...
कारण, त्याचं-तिचं आज नाही
ब-याच वर्षांपूर्वी break-up झालंय...

कधी परत येशील?

तू परत येशील?

खूप दिवसांनी ती मला भेटली
काही न विचारता अगदी मुदयावर आली
तिच्या शब्दांनी तन सुन्न झाले
ते ऐकून डोळे अगदी भरून आले

"विसरून जा मला" अस ती म्हणाली
पुन्हा न भेटण्याची ताकीद तिने मला दिली
काही न बोलता मी खाली मान टाकून उभा होतो
डोळ्यात येणार्‍या त्या थेंबांना मी अडवत होतो

ती निघून गेली
तिच्या पलटण्याची वाट पहिली
ती परत येईल, ती मला समजून घेईल
पण ती वाट फक्त एक आसच राहिली

तिच्या सुखाताच माझ सुख बघितल
तिच्या दु:खातच माझ दु:ख पाहील
अस कधी ती करेल वाटल नव्हत
कारण तिच माझयावर खूप प्रेम होत

माहीत नाही काय कारण आहे
ती मझयशी दूर जात आहे
कधी तरी तु माझया भावना समजशील
माझ्यासाठी कधी तू परत येशील?

आपल्या मनाला.....

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं

गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

परक्यांपेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग् नजरे आडून वार होतात
भळभळणा-या जखमेतून विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणच पुसायचं असतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं हा कुठला न्याय आहे...
माणूस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं, थोडं दुस-यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते आकर्षणंच असतं...
मान्य आहे, आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतं वेडं आपण व्हायचं नसतं..
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं...